रत्नागिरी : पऱ्याची आळी येथे भरदिवसा घरफोडी; दागिन्यांसह ९४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Jul 17, 2024 - 10:05
 0
रत्नागिरी : पऱ्याची आळी येथे भरदिवसा घरफोडी; दागिन्यांसह ९४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

रत्नागिरी : शहरातील पऱ्याची आळी येथील सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना रविवार, दि. १४ जुलै रोजी दुपारी १२.४५ ते सायंकाळी ६ वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवार १४ जुलै रोजी ते कुटुंबासह त्यांच्या सासरी लांजा शिपोशी येथे गेलेले होते. या संधीचा फायदा उठवत अज्ञाताने पऱ्याची आळी येथील दिगंबरदास प्लाझामधील फिर्यादीच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी व कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्या नंतर लोखंडी गोदरेज कपाटाच्या दरवाजाचा लॉकर उचकटून सोन्याचे ५० ग्रॅम वजनाचे ६९ हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोख २५ हजार रुपये असा एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल लांवबला. रविवारी सायंकाळी फिर्यादी घरी आल्यावर त्यांना सदनिकेच्या दरवाजाची कडी व कुलुप उचकटलेले दिसून आले. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिल्यावर त्यांना कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३),३०५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow