वाढत्या महिला अत्याचार निषेधार्थ माहेर संस्थेचा कॅन्डल मार्च

Aug 21, 2024 - 11:21
 0
वाढत्या महिला अत्याचार निषेधार्थ माहेर संस्थेचा कॅन्डल मार्च

रत्नागिरी : कोलकत्ता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या तसेच बदलापूर शहरांमध्ये अल्पवयीन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात माहेर संस्था रत्नागिरी यांच्या वतीने माहेर संस्थेच्या संस्थापिका संचालिका सि. लुसी कुरियन यांच्या मार्गदर्शनाने पीडीतेंना न्याय मिळवण्यासाठी  महिला भगिनींची सुरक्षितता राहावी व पुन्हा असे प्रकार होऊ नये यासाठी कॅन्डल मार्च आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी संस्थेतील प्रवेशितांनी वाँट जस्टीस, अत्याचार थांबवा असे फलक व जळत्या मेणबत्ती हातात घेऊन समर्थ नगर हातखंबा येथे मुख कॅन्डल मार्च करून निषेध व्यक्त केला. तसेच अत्याचारात बळी पडलेल्या महिलांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. 

या प्रसंगी माहेर संस्था रत्नागिरीचे प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे, कर्मचारी शीतल हिवराळे, रुतिका मरसकोल्हे, विजया कांबळे, माधुरी पांचाळ, आशिष मुळे व संस्थेतील प्रवेशित मुले मुली महिला उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 21-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow