भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी तालुका संघटकपदी नंदकुमार यादव

Jul 17, 2024 - 10:22
Jul 17, 2024 - 11:23
 0
भारतीय बौद्ध महासभेच्या रत्नागिरी तालुका संघटकपदी नंदकुमार यादव

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील भगवतीनगर बौद्धवाडी येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेचे ज्येष्ठ सल्लागार तथा मुख्य मार्गदर्शक आणि फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक नंदकुमार शिवराम यादव यांची रत्नागिरी तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका संघटकपदी नव्याने नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचा रत्नागिरी तालुका शाखा बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि त्यांचे सहकारी यांच्या ग्रुपच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्यासमवेत ज्येष्ठ बौद्धाचार्य रविकांत पवार, राजकुमार जाधव, पत्रकार संतोष पवार, वैभव पवार उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 17-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow