रत्नागिरी : जिल्ह्यात विविध ठिकाणी तिरंगा फेरी

Aug 12, 2024 - 10:13
Aug 12, 2024 - 10:13
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात विविध ठिकाणी तिरंगा फेरी

त्नागिरी : घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगर पंचायतींमध्ये शनिवारी शालेय विद्यार्थ्यांची तिरंगा फेरी काढण्यात आली. पावस येथे पालकमंत्री उदय सामंत तिरंगा फेरीत सहभागी झाले होते.

ढोल, ताशे, लेझिमसह पावस येथे शालेय विद्यार्थ्यांची फेरी निघाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते. लांजा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये शाळा, ग्रामस्थ यांच्या सहभागाने तिरंगा फेरी काढण्यात आली. ढोल, ताशा, झांज आणि देशभक्तीपर नारे देत शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढली. दापोली पंचायत समितीमार्फत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत याची सांगता झाली. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. खेड येथे मोटारसायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड नगरपंचायतीमार्फतही विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची फेरी, सेल्फी पॉइंट, प्रतिज्ञा घेण्यात आली. चिपळूण पालिकेने विद्यार्थ्यांची फेरी काढली. त्यात एनसीसी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 12-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow