देवरूख आगारातून ३ हजार ४६२ विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण

Jul 17, 2024 - 10:38
Jul 17, 2024 - 14:42
 0
देवरूख आगारातून ३ हजार ४६२ विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण

देवरूख : अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी मोफत एसटी पास योजनेत देवरूख आगारातून संगमेश्वर तालुक्यातील ६१ शाळांमधील ३ हजार ४६२ विद्यार्थिनींना शाळेत एसटी पास देण्यात आले. या योजनेसाठी देवरूख आगारातून नियोजन करत चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले. यानुसार तालुक्यातील देवरूख, साखरपा, संगमेश्वर व माखजन या बसस्थानकांतील कर्मचारी यांनी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन योजनेची जनजागृती केली. 

याप्रमाणे शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची माहिती घेऊन ते पास तयार करून शाळांमध्ये वाटप करण्यात आले. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. १३ जून ते १५ जुलै या कालावधीत योजना कार्यान्वित केली. यातून ६१ शाळांमधील ३ हजार ४६२ विद्यार्थिनींना पास वाटप करण्यात आले. याचबरोबर विद्यार्थी वर्गालाही मागणीनुसार बसस्थानकातून तत्काळ पास वाटप करण्यात आले. यामुळे पास खिडकीत कोणतीही गर्दी दिसून आली नाही. यापुढेही पासची गरज भासल्यास विद्यार्थिनींनी त्वरित आगाराशी संपर्क साधण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक हनुमंत फडतरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 17/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow