रत्नागिरी : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई

Jul 18, 2024 - 12:07
 0
रत्नागिरी : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा बाजारपेठेत एसटी पिकअप शेडसमोर सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशारीतीने वाहन पार्क करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवार १६ जुलै रोजी सकाळी ११.३० वा. करण्यात आली. 

विश्वास शंकर बारगुडे (२३, रा. वाटद तांबटकरवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मंगळवारी दुपारी त्याने आपल्या ताब्यातील वाहन (एम एच ०८ ए एन ५९३७) खंडाळा बाजारपेठेत अन्य वाहतुकीला अटकाव होईल, अशा धोकादायक रीतीने पार्क करून ठेवले होते. त्याच्या विरोधात भारतीय न्याय कलम संहिता २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 18-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow