Ratnagiri : जिल्ह्याला मिळाले ६१ नवे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर

Jul 18, 2024 - 12:08
Jul 18, 2024 - 12:15
 0
Ratnagiri : जिल्ह्याला मिळाले ६१ नवे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर

रत्नागिरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्याला ६१ नवे 'सीएचओ' म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर मिळाले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत या अधिकाऱ्यांना उपकेंद्रावर नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्यात गरोदर मातांपासून, वयोवृद्ध व्यक्तीला सेवा पोहोचवणे हा कम्युनिटी आरोग्य अधिकारी नेमण्यामागील उद्देश आहे. ग्रामीण आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी शासनाने काही वर्षांपूर्वी हे पद निर्माण केले होते. जिल्ह्यातील ३७८ उपकेंद्रांपैकी जवळपास १०० पेक्षा जास्त उपकेंद्रांत अधिकारी कार्यरत आहेत. आता नव्याने पुन्हा अधिकारी मिळाल्याने ग्रामीण आरोग्याला दिलासा मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांत समुपदेशनाद्वारे गुणवत्तेनुसार ६१ जणांना नियुक्त्या दिल्या. जि.प.च्या शामराव पेजे सभागृहात ही समुपदेशन प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या उपस्थितीत पार पडली. या सर्वजणांना ८ दिवसांत हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आता उपकेंद्रातील आरोग्य सेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow