चिपळूण : महामार्गावर खेरशेतमध्ये दरड कोसळली

Jul 19, 2024 - 10:33
 0
चिपळूण : महामार्गावर खेरशेतमध्ये दरड कोसळली

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत येथे रात्री दरड कोसळली. महामार्गाचे काम सुरू असलेल्या लेनवर ही दरड कोसळली. सिमेंट काँक्रिटचे काम झालेला रस्ता वाहतुकीसाठी खुला होता. सायंकाळी उशिरापर्यंत ही दरड हटवण्याचे काम महामार्ग विभागाकडून सुरू होते.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात पावसाचा जोर वाढला आहे. चिपळूण ते हातखंबादरम्यान चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर ८० टक्के एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या लेनचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी डोंगरकटाई झाली आहे. या डोंगराची माती नाल्यामध्ये पडली आहे. ती बाजूला न केल्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर रस्त्यावरून चक्क नदी वाहत असल्याचा भास होतो. मुसळधार पाऊस झाल्यानंतर या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका मोठा आहे. धामणी येथे महामार्ग खचण्याची भीती निर्माण झाली आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरवात झाली आहे.

धामणी येथील रेल्वे ब्रीजच्याजवळ महामार्ग धोकादायक झाला आहे. त्यातच असता दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी रात्री खेरशेतच्या जवळ मोठी दरड कोसळता गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला समजल्यानंतर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचे दोन पोकलेन आणि चार डंपर घटनास्थळी पोहोचले आहेत, दुपारपर्यंत दरड हटवण्याचे काम सुरू होते.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेरशेत परिसरात रस्त्यावर दरड कोसळली: परंतु महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला नाही. या घटनेची माहिती भेटल्यानंतर आम्ही दरड हटवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. - राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow