माळनाका येथे चारचाकी रुतली खड्ड्यात

Jul 19, 2024 - 10:28
 0
माळनाका येथे चारचाकी रुतली खड्ड्यात

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिरनजीक माळनाका येथील एसटी अधिकारी कॉलनीसमोर खोदाई केलेल्या खड्ड्यात मालवाहू चारचाकी रुतून अडकली होती. जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. दुरूस्ती झाल्यानंतर मातीचा भराव टाकण्यात आला. त्या भरावावरून मालवाह चारचाकी पुढे जात असताना भरावाची माती दबली जाऊन गाडीचे चाक रुतले गेले. 

एसटी अधिकारी कॉलनीसमोर जलवाहिनी कचरा, मातीने तुंबली होती. ही जलवाहिनी मोकळी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला खोदन जलवाहिनी साफ करण्यात आली. त्यानंतर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तो खड्डा मातीचा भराव टाकून भरला. गुरूवारी दुपारच्या वेळी ही चारचाकी रस्त्याच्या कडेने जात असताना भराव केलेल्या खड्यात चाक रुतले गेले. येथील दुकानदार आणि नागरिकांना ही गाडी खड्ड्याबाहेर काढण्यासाठी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow