खेड : महिला होमगार्डच्या सतर्कतेने सापडला चोरीला गेलेला मोबाईल

Jul 19, 2024 - 10:22
Jul 19, 2024 - 12:23
 0
खेड : महिला होमगार्डच्या सतर्कतेने सापडला चोरीला गेलेला मोबाईल

खेड : येथील बसस्थानकात कर्तव्य बजावणाऱ्या खेड होमगार्ड पथकातील महिला होमगार्ड नीलम भिकाजी शिर्के यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेला मोबाईल परत मिळाला. 

नीलम शिर्के यांना खेड बसस्थानकात दोन व्यक्ती भांडण करताना दिसले. तेव्हा कर्तव्यावर असणाऱ्या शिर्के यांनी त्यांना त्यांचे भांडण थांबविण्यास सांगितले. त्यातील एकजण त्यांना संशयास्पद वाटला म्हणून त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ त्यांना एक विवो कंपनीचा मोबाईल सापडून आला. (अंदाजे किंमत १५ ते १८ हजार रुपये) त्यातील एका नंबरवर फोन केला असता तो मोबाईल नितीन बाळकृष्ण जोशी (रा. लवेल) यांचा असल्याचे समजले. तो मोबाईल १३ जुलै रोजी रात्री खेड बसस्थानकातून चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा त्या चोरी करणाऱ्या व्यक्तीने लगेच पळ काढला. मात्र तो मोबाईल नीलम शिर्के यांनी ताब्यात घेत मोबाईल नितीन बाळकृष्ण जोशी यांना परत केला. पलायन केलेल्या संशयिताचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 19-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow