रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून महिलेची १ लाख ९० हजारांची फसवणूक

Jul 19, 2024 - 10:24
Jul 19, 2024 - 16:33
 0
रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून महिलेची १ लाख ९० हजारांची फसवणूक

रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल १ लाख ९० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. 

फसवणुकीची ही घटना २५ फेब्रुवारी रोजी ११ ते २ एप्रिल २०२४ रोजी रात्री १२ वा. कालावधीत थिबा पॅलेस रोड येथे घडली आहे. माया सालम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. 

तिने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करुन त्यांच्याशी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मोबाईलवर लिंक पाठवली. व्हिट्रेड हे अॅप डाऊन लोड करण्यास लावून त्याद्वारे फिर्यादींना आपल्या बँक खात्यात १ लाख ९० हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास लावून फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:53 PM 19/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow