मंडणगड : कुंबळेत रस्त्यावर कोसळले झाड

Jul 20, 2024 - 10:28
 0
मंडणगड : कुंबळेत रस्त्यावर कोसळले झाड

मंडणगड : तालुक्यात कोसळणाऱ्या पावसामुळे कुंबळे येथे राज्यमार्गावर झाड कोसळले. हे झाड ३३ केव्ही वीज वाहिनीवर कोसळल्याने सुमारे तीन तास पूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा खंडित झाला. तसेच महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली. झाड कोसळत असताना रस्त्यावरून प्रवास करणारा दुचाकीस्वार ऋत्विक कदम झाडाखाली सापडून जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी महाड येथे पाठवले.

मंडणगड तहसील कार्यालयाचे आपत्ती निवारण पथक, मंडळ अधिकारी व तलाठी घटनास्थळी दाखल झाले. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने महामार्गावर पडलेले झाड तातडीने हटवण्यासाठी जीसेबी पाठवले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर झाड रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. वीज वाहिनीवर झाड पडल्याने महावितरणच्या पथकानेही घटनास्थळी दाखल होऊन खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow