चिपळूण : टेरवमध्ये जमीन वादातून मारहाण

Jul 20, 2024 - 10:29
 0
चिपळूण : टेरवमध्ये जमीन वादातून मारहाण

चिपळूण : तालुक्यातील टेरव राधाकृष्ण येथे जमिनीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना गुरुवारी (ता. १८) सकाळी घडली. 

या मारहाणीत एकजण किरकोळ जखमी झाला आहे. अजित कृष्णकांत मोरे व अपर्णा अजित मोरे (रा. टेरव, चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत फिर्यादी सुरसिंग रामचंद्र कदम (रा. टेरव) हे जखमी झाले आहेत. टेरव येथील सामायिक शेतजमिनीत शेतनांगरणीचे काम सुरू होते. त्यासाठी टेरव सुतारवाडी येथील पांडुरंग गोपाळ वास्कर यांचा पॉवरटिलर घेऊन नांगरणी सुरू होती. त्याचवेळी सुरसिंग कदम व त्याचा मोठा भाऊ शिवाजी रामचंद्र कदम यांनी या जमिनीबाबत वाद सुरू असल्याने शेतजमीन नांगरणी करू नको, असे सांगितले. त्याचा राग येऊन अजित मोरे व अपर्णा मोरे यांनी कदम यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शेतातील काठीने मारहाण केली. यामध्ये कदम यांच्या डाव्या डोळ्याजवळ जखम झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow