खेड : चिंचघर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती पवार यांची बिनविरोध निवड

Jul 20, 2024 - 13:43
 0
खेड : चिंचघर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती पवार यांची बिनविरोध निवड

खेड : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी स्वाती अविनाश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिंचघर ग्रामपंचायतीच्या सरपंच करीमुनिसा सांगले यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंचपदासाठी स्वाती पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नायब तहसीलदार एल. एम. सिनकर यांनी स्वाती पवार यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांच्या समर्थकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

यावेळी सरपंचपदी निवड झाल्यानंतर स्वाती पवार यांचे माजी आमदार संजय कदम, सायली कदम, माजी सरपंच करीमुनिसा सांगले यांच्यासह अनेक सदस्य, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. करीमुनिसा सांगले, ग्रामसेवक किशोर क्षीरसागर, उपसरपंच मदन कदम, माजी उपसरपंच नागेश शिगवण, सदस्य सखाराम जाधव, भारती सुतार, समृद्धी प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेश पवार, सचिव सारिका पवार, ग्रामस्थ सचिन शैले, रती शिंदे, अनिल धोत्रे, रमेश पतार, संतोष शिंदे, तनू सावंत, वैशाली चव्हाण, दीपाली अलकुटे, रुपेश महाडिक, सायली कडू, शिल्पा चरेकर उपस्थित होत्या. सरपंचपदी निवड झाल्यानंतर स्वाती पवार यांनी श्री भैरवनाथ देवस्थान येथे श्रीफळ देऊन आशीर्वाद घेतला. आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित सरपंच स्वाती पवार यांनी दिली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow