रत्नागिरी : जिल्ह्यातील ६२६ बालकांना अतिसार

Jul 20, 2024 - 14:55
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील ६२६ बालकांना अतिसार

रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवडात जिल्ह्यातील ७० हजार ५५० पाच वर्षांखालील बालकांची तपासणी करण्यात आली, यामध्ये ६२६ बालकांना अतिसार झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत.

गत महिन्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. 'अतिरारावर करूया मात, १४ दिवस झिंक, दिवसातून एकदा, ओआरएस झिंकची घेऊ साथ अशी टॅगलाईन याला देण्यात आली होती. अर्भक मृत्युदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे, त्यानुसार अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून अतिसार नियंत्रस पंधरवडा राबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली

अतिसारामध्ये ओआरएएसचे द्रावण व झिंक गोळी सर्वांत प्रभावी उपचार पद्धती असून अतिसाराला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक त्या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत अतिसार झालेल्या बालकात सौम्य किवा गंभीर जलशुष्कता, अस्वस्थपणा चिडचिडेपणा, डोळे खोल बाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेचा चिमटा घेतला असल्यास हळूहळू पूर्ववत होणे, सुस्तावलेला किंग बेशुद्ध अवस्थेत पडणे, स्तनपान टाळणे किंवा बळजबरीने स्तनपान करणे अशी लक्षणे आढळून येतात.

जिल्ह्यात अतिसार पंधरवड्याच्या कालावधीत जिल्ह्यातील ७० हजार ५५० बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६२६, वालकांना अतिसार झाल्याचे स्पष्ट झाले होते, त्यांच्यावर त्वरित औषधोपचार करण्यात आले.

अशी घ्यावी काळजी...
मातांनी स्वयंपाक करण्यापूर्वी, बालकाला जेवण भरण्यापूर्वी तसेच बालकाची स्वच्छता केल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धवून घ्यावेत पिण्याचे पाणी स्वच्छ असल्याची खात्री करावी. ते सुरक्षित व झाकण असलेल्या भांडयात साठवले असल्याची खात्री करावी बालकाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. नेहमी शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौच करू नका बालकाला अतिसार झाल्याबरोबर तसेच प्रत्येक वेळी शौच झाल्यावर बालकाला लगेच ओआरएसचे द्रावण द्यावे. एका चमच्यात पिण्याचे पाणी किंवा मातेचे दुध घ्यावे व त्यात एक झिंकची गोळी विरघळून बालकाला दिवसातून एकदा अशा प्रकारे १४ दिवस द्यावी अतिसारादरम्यान व नंतर बालकाला पूरक आहार आणि स्तनपान देणे चालू ठेवावे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 20/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow