रत्नागिरी : नेहल कोटकर यांच्या चित्रशाळेतील गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना

Aug 20, 2024 - 12:47
 0
रत्नागिरी : नेहल कोटकर यांच्या चित्रशाळेतील गणेशमूर्ती अमेरिकेला रवाना

रत्नागिरी : कोकणवासीयांना लाडक्या गणरायाचे वेध लागले आहेत. आकर्षक गणरायाच्या मूर्ती बनवण्यात आणि रंगकाम करण्यात गावागावांतील चित्रशाळा गजबजलेल्या आहेत. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मूर्ती बनवण्याच्या कलेत अनेक महिलाही तरबेज झालेल्या पाहायला मिळतात. गावातील काही महिलांनी सुबक मूर्ती काढण्याच्या व्यवसायात नव्याने उभारी घेतली आहे. तालुक्यातील गणेशगुळे वझरेकरवाडी येथील प्रसिद्ध मूर्तिकार ज्ञानेश कोटकर यांच्या चित्रशालेचा कारभर नेहल कोटकर या सांभाळत आहेत. त्यांनी स्वतःला या कामात झोकून दिले असून, त्यांनी बनवलेल्या ५० गणपती मूर्ती अमेरिकेसह जिल्ह्यात विविध भागात रवाना झाल्या आहेत.

नेहस हिला सुबक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याचे कौशल्य तिचे पती ज्ञानेश फोटफर यांच्याकडून अवगत झाले. लग्नानंतर नेहल फावल्या वेळात घरातील चित्रशाळेत काम करत होत्या. पतीकडून गणेशमूर्ती बनवण्याची कला अवगत केली, कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती त्या उत्कृष्टपणे बनवतात. स्वतः बरला आत्मसात केल्यानंतर त्यांनी बेरोजगार महिलांनाही या कामात सहभागी करून घेतले, त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केली. वर्षभर चालणाऱ्या या व्यवसायात महिलांचा चांगला हातभार लागतो. सध्या याकडे दिशा वझरेकर वझरेकर ममता मावळकर, प्राची वझरेकर  या महिला काम करतात. सासू-सासरे आणि पती ज्ञानेश यांचे पाठबळ सहकार्यामुळे मूर्तिकलेत पारंगत झाले असे कोटकर यांनी सांगितले.

पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे ही संकल्पना चित्रात काम सुरू आहे मूर्तिकार नेहल यांनी गेली १५ वर्ष शाडू मातीसह कागदी लगद्यापासून मूर्ती घडवण्याची कला पतीकडून शिकून पेवली. लगदा आणि शाडू माती यांचे प्रमाण किती पाहिजे यावर गणपती मूर्तींचे वजन ठरते तसेच वी मूर्ती टिकाऊ होईल याकडेही लक्ष द्यावे लागते. हे बारकावे नेहल यांनी शिकून घेतले तसेच साचे भरण्यापासून ते रंगकामापर्यंत सर्वकाही आत्मसात केले.

सुरुवातीला एक गणपती साकारता त्यानंतर वर्षानुवर्षे मूर्ती साकारताना कौशल्यातून सुबक मूर्ती कशी असाची, हे ज्ञात झाले. सध्या यंदा ५५० मूर्ती त्यांनी मुंबई, गुहागर, नाशिक, लांजा आणि परदेशात अमेरिकेत पाठवल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे शाडू माती व कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, गणेशगुळेसारख्या ग्रामीण भागातील महिला कारागिरांना रोजगाराचे नवे दालन नेहल यांनी उभे करून दिले आहे. चार महिलांसह आल्हाद जाधव, शुभम वझरेकर, राज वझरेकर या गावातील कलाकारांचे या चित्रशाळेला सहकार्य मिळत आहे.

महिता मूर्तिकार नेहल कोटकर
राजेशमूर्ती साकारताना कुटुंबासह सरकारी महिला कारागिरांचेही सहकार्य मिळते. वजनाला किफायतशीर आणि कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक सुबक मूर्ती तयार करताना आनंद मिळतो. गणपती कलाकेंद्रात मूर्तीना मागणीही वाढत आहे. सर्वांच्या सहकार्याने गेली पंधरा वर्षे मिळालेल्या अनुभवातून हे शक्य झाले. नेहल कोटकर, मूर्तिकार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:14 PM 20/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow