मालगुंड येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

Jul 22, 2024 - 11:36
Jul 22, 2024 - 11:54
 0
मालगुंड येथे प्रौढाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथे प्रौढाने गेस्टरुमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार २० जुलै रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास उघडकीस आली.

प्रकाश मारुती कुंभार (४४, मूळ रा. चिकोडी बेळगाव, कर्नाटक) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.

प्रकाश हा खबर देणार यांच्याकडे चालक म्हणून नोकरीला होता. तो त्यांच्याच घरातील गेस्टरुममध्ये रहात होता. शनिवारी सकाळी ११.३० वा. सुमारास खबर देणार हे प्रकाश कुंभारच्या रुममध्ये गेले असता तो सिलिंग फॅनला बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खबर देणार यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 22-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow