दापोली : आंजर्लेत अंगणवाडीची भिंत कोसळली

Jul 22, 2024 - 11:28
 0
दापोली : आंजर्लेत अंगणवाडीची भिंत कोसळली

दापोली : गेले २४ तास तालुक्यात मुसळधार पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. पावसामुळे आंजर्ले येथील अंगणवाडीची भिंत, तर मौजे म्हाळुंगे येथे घरावर विजेचा खांब कोसळून मोठे नुकसान झाले.

मांदिवलीमध्ये पूल पाण्याखाली गेल्याने कवडोली, पिचडोली, देव्हारे आणि मंडणगडकडे जाणारा मार्ग बंद पडला पाच दिवसांपूर्वी आंजर्ले येथील मराठी शाळेवर झाड कोसळल्यामुळे मुलांना बाजूच्या वर्गांमध्ये बसवले जात आहे. रविवारी दुपारी साडेतीननंतर आंजर्ले येथील अंगणवाडीच्या जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळली. त्यामुळे संपूर्ण इमारत धोकादायक झाली आहे. यामुळे अंगणवाडी इतरत्र भरवण्यात येत आहे.

म्हाळुंगे येथील दिलीप काशिराम माने यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले. याठिकाणी विजेचा खांब पडला आहे. या घटनेचा पंचनामा करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली. भारजा नदीला आलेल्या पुराने मांदिवली पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक थांबली आहे. या पुलाजवळच असलेल्या अनंत भानत यांच्या घराला पुराचे पाण्याने वेढा घातला आहे.

पावसाळ्यात पुराचे भारजा नदीच्या पुलावरून पाणी वाहणे ही दरवर्षीची समस्या झाली आहे. त्यामुळे हा पूल नव्याने बांधून या पुलाची उंची वाढवावी. जेणेकरून पावसाळ्यात खंडित होणारी वाहतूक पूर आल्याने खंडित होणार नाही. दापोलीकडील गावाची पुणे, मुंबई, बोरीवली, ठाणे, हरिहरेश्वर, मंडणगड, महाडकडे होणारी वाहतूक सुरळीतपणे सुरू राहील. - गुणाजी गावणूक, आमखोल, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 AM 22/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow