निवळी-बावनदी रस्त्यालगत गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

Jul 23, 2024 - 10:09
Jul 23, 2024 - 12:31
 0
निवळी-बावनदी रस्त्यालगत गावठी हातभट्टीची दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

➡️ रत्नागिरी : निवळी ते बावनदी जाणाऱ्या रस्त्यालगत बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, दि. २१ जुलै रोजी दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. महेंद्र हरिश्चंद्र सांडीम (रा. तळेकांटे सांडीमवाडी, संगमेश्वर) असे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात हेडकॉन्स्टेबल मंदार अनंत मोहिते यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित हा रविवारी निवळी-बावनदी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीझुडपाच्या आडोशाला विक्रीसाठी गावठी हातभट्टीची ५५० रुपयांची ५ लिटर दारू आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 23-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow