बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात : जयंत पाटील

Jul 23, 2024 - 16:24
 0
बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, मित्र सोबत राहावे म्हणून खैरात : जयंत पाटील

मुंबई : महाराष्ट्राला अपेक्षा होत्या. भाजपाने तोंडाला पाने पुसली. कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही. आंध्र प्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी खैरात वाटण्यात आली.

देशात नवा बॅकलोक करण्यात येतो आहे. महाराष्ट्राला केंद्र सरकारने दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून आता संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत असून, एनडीएतील पक्षांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात येत आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या निधीची तसेच विविध योजनांची घोषणा करण्यात आली असून, यावरून इंडिया आघाडीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे.

शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे

शेतकऱ्यांसाठी काहीही नाही एकच योजना आहे. लँड रेकॉर्डसाठी एक योजना दिसते आहे. बजेटमधील घोषणा वाऱ्याची वरात आहे. शेतकऱ्यांसाठी एखादी पॉलिसी अशी पाहिजे होती की, केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भुर्दंड बसला, त्यांना काहीही मिळाले नाही. सरकार टिकवण्यासाठी आंध्र आणि बिहारला योजना दिल्या. बेरोजगारीचा दर वाढला आहे. आता त्यावर योजना काढत आहेत, तर त्याला उशीर झाला आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लाडकी बहीण, लाडका काका पुतण्या आहे सगळेच लाडके करा. पराभव झाल्यानंतरच्या योजना आहेत. लोक त्याला महत्त्व देत नसतात. महागाई आणि बेरोजगारी यासाठी काहीही दिसले नाही आमचे सरकार आले असते तर जीएसटी कमी करणार होतो. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगले चित्र राहील. आमच्यासाठी अच्छे दिन येणार आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow