खेड : भरणे येथे उड्डाणपुलाखाली खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला

Jul 24, 2024 - 10:27
Jul 24, 2024 - 10:31
 0
खेड : भरणे येथे उड्डाणपुलाखाली खड्ड्यांमुळे टेम्पो उलटला

खेड : मुंबई गोवा महामार्गावरील भरणे उड्डाण पुलाच्याखालील सर्व्हिस रोडवर सोमवारी खड्ड्यांमुळे एक टेम्पो उलटला. या अपघातात चालक बचावला असला, तरी येथे सातत्याने अपघात होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

महामार्गावरील भरणे नाका परिसर नेहमीच गजबजलेला असतो. परंतु सध्या या भागातील सर्व्हिस रोड वर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे संबंधित बांधकाम विभाग व ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. सोमवारी, दि.२२ रोजी भरणे उड्डाणपूल परिसरात पडलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एक टेंपो रस्त्यात उलटला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. दैव बलवत्तर म्हणून टेंपो चालक जखमी झाला नसला, तरी या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

भरणे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूचे सर्व्हिस रोड, पुलाखालील रस्ते खड्डे पडून नादुरुस्त झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे संबंधितांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 24/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow