रत्नागिरी : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सर्वेश दामले प्रथम

Jul 25, 2024 - 10:01
Jul 25, 2024 - 15:21
 0
रत्नागिरी : जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सर्वेश दामले प्रथम

खेड : रत्नागिरी चेस अॅकॅडमीतर्फे मराठा भवन कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे पार पडलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या सर्वेश श्रीकांत दामले याने प्रथम क्रमांक पटकावला.

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या (FIDE) १०० व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी चेस अॅकॅडमीतर्फे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील शाळांमधून जवळपास १७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सर्वेश दामले याने १३ वर्षे वयोगटामध्ये आपल्या बुद्धिबळ खेळ प्रकारातील कौशल्य दाखवून जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. बुद्धिबळाबरोबर वाचनाची विशेष आवड आहे. त्याने यापूर्वीही तालुका व जिल्हास्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्याला प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या यशस्वी खेळाडूला शाळेचे बुद्धिबळ प्रशिक्षक विनायक माने यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे चेअरमन विपीन पाटणे, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वेश दामले याचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow