लांजा : माचाळ येथे शाळेला ना संरक्षक भिंत, ना स्मशानभूमी रोड

Jul 25, 2024 - 10:18
Jul 25, 2024 - 12:21
 0
लांजा :  माचाळ येथे  शाळेला ना संरक्षक भिंत, ना स्मशानभूमी रोड

लांजा : तालुक्यातील माचाळ येथील जिल्हा परिषद शाळेला ना संरक्षक भिंत ना स्मशानभूमी. थंड हवेचे ठिकाण म्हणून नावाचे नाव पर्यटन महामंडळाने जाहीर केले आहे. अशा पर्यटनस्थळाच्या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

पर्यटकांनी या शाळेचा आसरा घेऊन शाळा परिसरात अस्वच्छता आणि कचरा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. १९६० साती समुद्रसपाटीपासून ४००० फुटांवर असलेल्या माचाळ हा अतिदुर्गम गावात येथील ग्रामस्थांनी डोक्यावर दगड आणि सामान आणून शाळा बांधली आहे. माचाळ गाव हा अतिदुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. या गावात १०० घरे असून, हजारावर लोकसंख्या आहे. या गावात शैक्षणिक सुविधांसाठी पहिली ते सातवीपर्यंतची शाळा १९६० मध्ये सुरू झाली. प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी येथील मुलांना दहा ते पंधरा किमीची पायपीट करावी लागत होती. हे ओळखून गावातच प्राथमिक शाळा सुरु केली. जुन्या इमारतीला ७४ वर्षे झाली आहेत. काही वर्षापूर्वी या शाळा इमारतीची डागडुजी केली आहे. सत्तर वर्षांनंतर माचाळ गावी थेट रस्ता आल्यामुळे तेथील ग्रामस्थांना विविध पायाभूत सुविधा मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु आवश्यक असलेली शाळा सुविधा संरक्षक भिंत आणि स्मशानभूमी रोड या सुविधा अजूनही झालेल्या नाहीत माचाळ पालू ग्रामपंचायतीमध्ये मोडते. पालू ग्रामपंचायतीने अद्याप तिथे शाळा तसेच संरक्षक भिंत, स्मशानभूमी रोडचा प्रस्ताव केलेला नाही.

अनेक वर्ष रस्ता नाही. तेथे प्रमाणात सुविधा मिळत नाहीत. ग्रामस्थांनी डोक्यावर दगड वाहून घरे, शाळा बांधकाम पूर्ण केले होते. माचाळ येथील जिल्हा परिषद शाळेत सद्यस्थितीत अवघी १४ मुले शिक्षण घेत आहेत, दोन शिक्षक आहेत. - शरद काळे, उपसरपंच, पालू ग्रामपंचायत

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow