गुहागर : सागरी महामार्गाच्या रस्त्याचे होणार पुनःसर्वेक्षण

Jul 31, 2024 - 11:37
 0
गुहागर : सागरी महामार्गाच्या रस्त्याचे होणार पुनःसर्वेक्षण

गुहागर : गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सागरी महामार्गाच्या तालुक्यातील रस्त्याचे पुनः सर्वेक्षण होण्याकरता मंत्रालयात बैठक घेण्याबाबत बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना विनंती केली होती. त्यानुसार नुकतीच मंत्रालयात ना. चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा होऊन ना. चव्हाण यांनी गुहागरमधील सागरी महामार्गाचे पुनः सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गुहागर तालुक्यामध्ये सागरी महामार्ग जात असताना गुहागर शहराच्या निवासी भागातून हा महामार्ग जात आहे. त्याऐवजी गुहागर हद्दीच्या पूर्व बाजूकडे जाऊन गुहागरमधील वाकी पिंपळवट गावातून गुहागर शासकीय विश्रामधाम, न्यायालयाजवळ हा महामार्ग गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाला मिळाल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचा महामार्ग होईल. यामुळे अंतर कमी होईल, भूसंपादनाचे पैसे कमी होतील आणि गुहागर शहरांमधील निवासी वस्तीचे स्थलांतर होणार नाही. विशेष करून पर्यटनामध्ये वाढ होईल, अशा पद्धतीने या रस्त्याचा आराखडा करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ही बैठक आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यासमवेत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, चिपळूण तालुका अध्यक्ष अजित थरवळ, सतीश मोरे, चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेर्डी उपसरपंच विनोद भुरण, गुहागर शहराध्यक्ष नरेश पवार, गुहागर नगरपंचायत गटनेते उमेश भोसले, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow