गुहागर : तळवली येथे ३ ऑगस्ट रोजी गावठी बैल नांगरणी स्पर्धेचं आयोजन

Jul 25, 2024 - 10:40
Jul 25, 2024 - 16:52
 0
गुहागर : तळवली येथे ३ ऑगस्ट रोजी गावठी बैल नांगरणी स्पर्धेचं आयोजन

गुहागर : तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवस्थान तळवली यांच्यावतीने दि. ३ ऑगस्ट रोजी भव्य सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गावठी बैलजोडीसाठी असणार आहे. यामध्ये जॅकी कितीही जोड्या पळवू शकणार आहे. स्पर्धा श्री सुकाईदेवी ग्रामदेवता मंदिर तळवली येथे होणार आहे. प्रथम क्रमांकास रोख रु.७ हजार व चषक, द्वितीय रु. ६ हजार व चषक, तृतीय रु.५ हजार व चषक, चतुर्थ क्रमांकास रु. ४ हजार व चषक, अनुक्रमे रु. ३ हजार व चषक, शष्ट क्रमांकास रोख रु. २ हजार व चषक, तसेच सप्तम, अष्टम व विशेष सुंदर जोडी यांना रोख १ हजार व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग नोंदणी दि. १ ऑगस्टपर्यंत करायची आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी प्रदीप चव्हाण, गणपत शिगवण, अभिषेक सांगळे यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:08 PM 25/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow