सुरक्षारक्षकांना आता 'पॅरामिलिटरी' रंगाचा मिळणार गणवेश

Jul 26, 2024 - 16:27
Jul 26, 2024 - 16:30
 0
सुरक्षारक्षकांना आता 'पॅरामिलिटरी' रंगाचा मिळणार गणवेश

रत्नागिरी : रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली आदी १४ जिल्ह्यांमध्ये विविध आस्थापना, बँका आणि प्रमुख मंदिरांच्या सुरक्षेचा भार सांभाळणाऱ्या सुरक्षारक्षक मंडळाने खाकीची लवई अखेर जिंकली आहे. मंडळाच्या सुरक्षारक्षकांना आता पॅरामिलिटरी कोब्रा प्रकारचा गणवेश वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी संघटनेच्या प्रतिनिधीत झालेल्या बैठकीत ही मंजुरी दिली गेली वर्षे हे सुरक्षारक्षक गणवेशाचा रंग बदलण्यासाठी लढा देत होते, राज्यातील महापालिका, नगरपालिका यांच्यासह इतर विविध आस्थापना, सरकारी रुग्णालये बँका, प्रमुख मंदिरे, शाळा आदीना सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षा पुरवली जाते. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये या मंडळाचे सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत आहेत. कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेचा काही भागही खांद्यावर आहे; मात्र गणवेश निळ्या रंगाचा असल्याने लोकांवर त्यांची मागावी तशी छाप पडत नव्हती.

मंडळाच्या मागून आलेल्या अनेक सुरक्षारक्षक एकन्सीच्या गणवेशाचा रंग पॅरामिलिटरी करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या गणेशाचा मूळ रंग बदलून तो खाकी किंवा पॅरामिलिटरी करावा, अशी मागणी राज्यभरातील सुरक्षारक्षकांकडून नऊ वर्षापासून केली जात होती. या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते. सिंधूरत्न योजनेचे संचालक किरण सामंत यांचेसुद्धा या विषयाचा पाठपुरावा केला होता, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी गणवेशाविषयी घेतलेल्या निर्णयाबाबत भारतीय सुरक्षारक्षक आणि श्रम कामगार युनियनचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हरेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:52 PM 26/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow