दुचाकी घसरून दोन तरुण गंभीर जखमी

Jun 11, 2024 - 14:21
 0
दुचाकी घसरून दोन तरुण गंभीर जखमी

वेळणेश्वर : पावसाला थोडी सुरुवात झाली असून रस्ता अजून पुरेसा धुपलेला नाही. सोमवारी गुहागर विजापूर हायवे वरील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जवळ हॉटेल झायकासमोर दुचाकी घसरून दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एकाची परिस्थिती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे सिविल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. हे तरुण चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील आहेत.

अभिषेक बांद्रे व प्रसाद बांद्रे अशी जखमी तरुणांची नावे असून अपघात झाल्यानंतर तात्काळ त्यांना शृंगारतळी येतील ओक ह्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. एकाच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे त्याला रत्नागिरी सिव्हल येते पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तरुणांचे नातेवाईक ही शृंगारतळी मध्ये दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच गुहागर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 11-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow