Pune Rain: पुण्यातील पूर ओसरायला सुरुवात

Jul 26, 2024 - 11:44
 0
Pune Rain: पुण्यातील पूर ओसरायला सुरुवात

पुणे : पुण्यातील महापुराचा (Pune Flood) मोठ्या प्रमाणावर पुणेकरांना फटका बसला आहे. आज पुण्यात पावसानं विश्रांती (Pune Rain Update) घेतली असल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती नियंत्रणात आली आहे.

सिंहगड रोड, एकतानगर परिसर काल जलमय झाला होता. दरम्यान आज खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय त्यामुळे आज पुण्यातील पूरस्थिती (Pune Rain Update) नियंत्रणात आली आहे. सिंहगड परिसरात अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलं आहे. मात्र, अद्याप या भांगामध्ये वीज पुरवठा खंडीत आहे, पिण्याच्या आणि
वापराच्या पाण्याची कमतरता आहे. या भागात पाणी ओसरलं असून देखील अजून लाईट का नाही? याबाबत अधिकाऱ्यांनी कारण सांगितलं आहे.

यावेळी एबीपी माझाशी बोलताना वीज पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एमएससीबीची संपुर्ण टीम एकता नगर भागामध्ये पोहोचली आहे. मात्र अद्याप वीज सोडण्यात आलेली नाही त्याचं कारण म्हणजे, वीजेचे पॅनल आणि मीटर बोर्ड ओले आहेत. त्यामुळे शॉक लागण्याची शक्यता आहे. आपण हळूहळू वीज पुरवठा सुरू करणार आहोत. थोड्या वेळात वीज पुरवठा सुरू केला जाईल. ज्या घरातील मीटर बोर्ड ओले आहेत त्यांना काहीसा वेळ लागणार आहे. काही वेळाने वीज पुरवठा सुरू केला जाईल. काही भागात वीज सुरू केली आहे. टेस्टींग व्हॅन देखील या भागात आहे. ज्या भागात बोर्ड ओले नाहीत त्या भागात वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. त्यांना आवश्यक सुविधाही दिल्या असून, पूरस्थिती नियंत्रणात आहे. सध्या पावसाने देखील विश्रांती घेतली आहे,

खडकवासला धरणातून विसर्ग कमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाऊस थांबल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला.

एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील एकता नगरमध्ये अजूनही वीज खंडित आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी हे अजून महानगरपालिकेकडून पोहोचवण्यात आलेलं नाही.तसेच वापरण्यासाठी पाणी नाही. या परिसरातील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. पाणी ओसरल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी या ठिकाणी येऊन साफसफाई करत आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 26-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow