रत्नागिरी कामगार कल्याण केंद्र समरगीत स्पर्धेत तृतीय

Jul 29, 2024 - 14:02
 0
रत्नागिरी कामगार कल्याण केंद्र समरगीत स्पर्धेत तृतीय

त्नागिरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या चिपळूण गट कार्यालयातर्फे आयोजित गटस्तरीय समरगीत स्पर्धेत रत्नागिरी कामगार कल्याण केंद्राला तृतीय क्रमांक मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे पार पडलेल्या स्पर्धेत चिपळूण, खेर्डी, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवली येथील अकरा संघ सहभागी झाले होते. त्यामधून रत्नागिरी कामगार कल्याण केंद्राचा तृतीय क्रमांक मिळाला.

रत्नागिरी कामगार कल्याण केंद्राच्या संघात अंकिता तोडकरी, सुप्रिया तोडकरी, मधुरा काणे, नेहा शिंदे, शोभा पाटील, सुनीता तेली, प्रज्ञा देसाई, वैभवी पावसकर, सुवर्णा जंगम, रत्नप्रभा भडेकर, रेखा कोळेकर, अक्षय जंगम, हर्षद आडविलकर, पेटीवादक महादेव पटेकर, ढोलकी वादक सागर चाळके यांचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 29-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow