रत्नागिरी : जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार २५७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

Jul 29, 2024 - 15:47
Jul 29, 2024 - 15:49
 0
रत्नागिरी : जिल्ह्यातील ३ लाख ७९ हजार २५७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

रत्नागिरी :  जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले. अनेक गावे अंधारात गेली होती. २१ उपकेंद्रे, ११३ फिडर, ८९९ गावे, ५९ उच्चदाब वाहिनीचे विद्युतखांब, १८५ लघुदाब वाहिनीचे खांब व ३ लाख ८२ हजार ४८ ग्राहक बाधित झाले होते. त्यापैकी ३ लाख ७९ हजार २५७ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले आहे; परंतु अजूनही २ हजार ७९९ ग्राहक अंधारात आहेत.

अतिवृष्टीमुळे महावितरण कंपनीला चांगला फटका बसला. पूरस्थिती असल्याने आणि वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये २१ उपकेंद्रे, ११३ फिडर, ८९९ गावे, ५९ उच्चदाब वाहिनीचे विद्युतखांब, १८५ लघुदाब वाहिनीचे खांब व ३ लाख ८२ हजार ४८ ग्राहक बाधित झाले होते.

त्यापैकी २१ उपकेंद्रे, ११३ विर ८८३ गावे, २३ उच्चदाब वाहिनीचे खांब, ५४ लघुदाब वाहिनीचे खांबाचे काम महावितरण कंपनीने करून ३ लाख ७९ हजार २५७ ग्राहकांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. जिल्ह्यातील राजवाडी, बावनदी, तरवळ- बौध्दवाडी विल्ये-शीतपदवाडी, सावंडाव, मिलन, हासबे जवळेथार अजीवले, गोवळ, वाकेड, बोरथडे, इंदवटी, निवेशी, कुवे, पन्हळे गावांतील अंदाजे २४०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असून, हा वीजपुरवठा संध्याकाळपर्यंत चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:16 PM 29/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow