देवरुखात सोन्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी

Jul 30, 2024 - 11:13
 0
देवरुखात सोन्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी

देवरुख : शहरातील शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक नजीक आत्माराम बांडागळे यांचे आनंदम ज्वेलर्स हे दुकान शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, सेफ्टी दरवाजामुळे चोरीचा प्रयत्न असफल ठरला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

ज्वेलर्सचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटले मात्र लोखंडी दरवाज्यामुळ्ये चोरीचा प्रयत्न फसला. भर बाजारपेठेत चोरीचा प्रयत्न झाल्याने देवरूखात खळबळ उडाली. देवरुख पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देत केली पाहणी केली व्यापारी, नागरिकांनी सतर्क रहावे असे 12 सांगितले. चोरीचे घटना रोखण्याचे पोलिस यंत्रणेसमोर आव्हान. जोरदार पाऊस, लाईट नसणे याचा चोरटे फायदाव उचलतात दिसून आले. विशेष करून पावसाळ्यात असे प्रकार घडत असतात. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 30-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow