रत्नागिरी : येत्या २० ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत

Jul 30, 2024 - 11:37
Jul 30, 2024 - 12:38
 0
रत्नागिरी : येत्या २० ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत

रत्नागिरी : मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी/कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी ५५ वी पेंशन अदालत दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई ४००००१ येथे आयोजित केली असल्याचे डाकघर अधीक्षक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत/ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे ३ महिन्यांच्या आत पूर्तता झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी. पी. सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:04 PM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow