'महाराष्ट्र प्रीमियर लीग'थरार 'फॅनपार्क'द्वारे अनुभवता येणार..

Jun 1, 2024 - 10:05
 0
'महाराष्ट्र प्रीमियर लीग'थरार 'फॅनपार्क'द्वारे अनुभवता येणार..

रत्नागिरी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशतर्फे आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगचा थरार आता प्रत्यक्ष अनुभवण्याचा आनंद मिळणार आहे. 

फॅनपार्कच्या माध्यमातून यातील पहिलाच सामना रत्नागिरी जेट्सविरुद्ध कोल्हापुरी टस्कर्स असा होणार आहे. तो ३० फुट बाय १५ फुटच्या एलईडी वॉलवर पाहता येणार आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी बिपिन बंदरकर यांनी दिली.

येथील हॉटेल विवेक येथे बंदरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, पुण्यामध्ये हे सर्व सामने होणार आहेत. रत्नागिरीच्या संघाला रत्नागिरीकरांनी चांगले प्रोत्साहन द्यावे तसेच एमपीएलचा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घेत आनंद लुटावा यासाठी या फॅनपार्कचे आयोजन केले आहे. एमपीएलचा हा थरार अनुभवायची संधी २ जूनला संध्याकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत घेता येणार आहे. शहरातील उद्यमनगर येथील एम. डी. नाईक हॉल पटवर्धनवाडी येथे याचे आयोजन केले आहे. या वेळी करमणूक फनीगेम्स, लकी ड्रॉचे आयोजन केले आहे. सुट्टीचा हंगाम असल्याने मुलांसह रत्नागिरीकर, क्रिकेटप्रेमींनी जास्तीत जास्त याचा आनंद घ्यावा, असे आवाहन बंदरकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 01-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow