महाराष्ट्र सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात सामंजस्य करार

Jul 31, 2024 - 13:58
 0
महाराष्ट्र सरकार आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : जपानच्या टोयोटा किर्लोस्करनं (Toyota Kirloskar Motor) महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली आहे. या माध्यमातून एकट्या छत्रपती संभाजीनगर (Chhtrapati Sambhajinagar) येथे तब्बल 20 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

ज्यामधून सुमारे 8 हजार रोजगार निर्मिती होणार असून मराठवाड्याच्या(Marathawada) अर्थकारणाला त्यातून चालना मिळणार आहे. या निमित्याने देशात ऑटोमोबाईल क्षेत्रात महाराष्ट्राचा वरचष्मा कायम असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे.

ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये उभारणार प्रकल्प

हा प्रकल्प ग्रीनफिल्ड असणार आहे. तर महाराष्ट्र गुंतवणुकीचे क्रमांक 1चे राज्य असून सातत्याने एफडीआयमध्ये नंबर 1 क्रमांकावर कायम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गेल्या काही महिन्यांपासून टोयोटाच्या संपर्कात होते. त्याच अनुषंगाने त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आल्याचे बोलले जात आहे. आज प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत ही मोठी गुंतवणूक राज्यात आली आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रत्यक्ष सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. ⁠ऑरिक सिटीमध्ये 850 एकरमध्ये हा प्रकल्प साकारणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगातील एक क्रांती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून सुमारे 8 हजार थेट आणि अप्रत्यक्ष 8 हजार अशी 16 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख कार्सची निर्मिती होणे अपेक्षित आहे. छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच, शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, गीतांजली किर्लोस्कर, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे. एमआयडीसी सीईओ विपिन शर्मा यांच्या उपस्थित कार्यक्रम आज पार पडलाय.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow