दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगेंचा इशारा

Jul 31, 2024 - 14:02
 0
दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, मनोज जरांगेंचा इशारा

जालना : गोरगरिबांच्या दारात हे आले पाहिजे, आपण नाही जायचं. मराठा समाजाला आवाहन आहे की दरेकरांच्या अभियानात सहभागी होऊ नका, त्यांचा दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांनी रात्री माहीम,अंधेरी पूर्व, मलबार हिलला देखील बैठक घेतली. दोन-तीन दिवस थांबा मोठा पर्दाफाश होणार, असे सुचक वक्तव्य मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केले. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

जरांगे पुढे म्हणाले, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मी तुम्हाला मॅनेज होऊ शकत नाही. मराठ्यांच आंदोलन चिघळण्याचा डाव दिसत आहे. फडणवीस साहेब, आम्ही तुम्हाला आणखी शत्रू आणि विरोधक मानलं नाही. तुम्ही समजून घ्या, दरेकरच ऐकून डाव खेळू नका, असा इशारा जरांगे यांनी देवेंद्र फडणविस यांना दिला.

विद्यार्थ्यांना ईएसबीसी,ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तिन्ही आरक्षण ठेवावे. खोटी आश्वासन देऊन मुलीबाळींना फसू नका. मुलीना मोफत शिक्षणासाठीच्या अतिशर्थी रद्द करा. आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या झाल्या त्यांना तातडीने मदत आणि नोकरी द्या, हे सगळे विषय थोड्यावेळापूर्वी मंत्री शंभूराजे देसाई यांना सांगितले असल्याचे जरांगे म्हणाले. तसेच सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली त्याबद्दल समाजाच्यावतीने आभार, त्यांचे कौतुक आहे. मात्र, मुदतवाढ देऊन काम होत नाही. त्यांना काम करायला लावा, नुसत मुदतवाढ देऊन काही अर्थ नाही, असेही जरांगे म्हणाले.

मराठा आता पक्षाला महत्त्व देत नाही त्यांना पक्षात राहायची इच्छा राहिली नाही आता लढा सामान्यांच्या हातात आहे. आता टेन्शन घेत नाही. आता लवकर पर्दाफाश होणार आहे. १२ टे १३ संघटना दरेकरांनी फडवणीसांच्या सांगण्यावरून जमा केल्या आहेत. सरकारला वाटत ना विरोधी पक्ष बोलत नाही मला एक कळलं नाही त्यांच्या दारात आपण का जायचं, सरकारनं जावं ना मराठ्यांनी का ? करावा चपराशीपणा तुम्ही जाना मराठा समाजाचा जाब विचाराची ताकद आहे उद्धव ठाकरेच्या बंगल्यावर मराठा आंदोलन गेले यावरून सरकारला टोला लगावला.

सरकारला सल्ला
भाजप अतिचतुर नेत्यांचा पक्ष आहे. त्यांच्या आता लक्षात आलं की मराठे फोडायचे असेल तर याला संपावं लागतं. मराठ्यांची एकजूट आणि चळवळ बदनाम करू नका. नसता मराठ्यांना तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. मराठ्यांची धास्ती नाही घ्यायची तर कोणाची घ्यायची . मराठ्यांना आरक्षण देऊन टाका कसलेच समीकरण जुळवायची गरज नाही असा सरकारला सल्ला दिला.

प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी यांच्यावर...
आपली आघाडी नाही,काही नाही ,गोरगरिबांनी एकत्र यायचं आणि देणार बनवायचं शेवटची संधी आली अशी संधी पुन्हा येणार नाही विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढणार आहे गोरगरिबांची लढाई यावेळेस होणार आहे,आता सर्व सामान्यांची लाट येणार आहे असे राजु शेट्टी च्या भेटीवर जरांगे म्हणाले. जरांगे पाटील यांनी २८८ उमेदवार उभे करावे असे प्रकाश आंबेडकर बोलले होते यावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले २८८ जागा लढणारच आहे,त्यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानत आलो त्यांनी सांगितलं मराठा समाज त्यांना मानतो त्यांनी गरिबाच्या आणि गरजवंताच्या बाजूने राहावं एवढी अपेक्षा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 31-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow