तलवारबाजी स्पर्धेसाठी रत्नागिरीत उद्या निवड चाचणी

Jul 31, 2024 - 13:57
 0
तलवारबाजी स्पर्धेसाठी रत्नागिरीत उद्या निवड चाचणी

रत्नागिरी : सतरा वर्षे वयोगटातील राज्य तलवारबाजी मुले व मुली अजिंक्यपद स्पर्धा दादर येथे होणार आहे. स्पर्धा १६ ते १८ ऑगस्टला होणार आहेत. स्पर्धेसाठी १ जानेवारी २००८ नंतर जन्मलेली मुले व मुली सहभागी होऊ शकतात. स्पर्धा फॉईल, ईप्पी व सेबर या ३ प्रकारांत होणार आहेत. स्पर्धेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा फेन्सिंग असोसिएशनने १ ऑगस्टला रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी व जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. निवड चाचणी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सायंकाळी ४ वा. सुरू होणार आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा असोसिएशनच्या सचिव समिधा झोरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 31/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow