पांगरी घाटात सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Aug 1, 2024 - 10:01
Aug 1, 2024 - 10:06
 0
पांगरी घाटात  सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी : रत्नागिरी व देवरूखला जोडणारा महत्वाचा मार्ग असलेला देवरूख रत्नागिरी - मार्गावर पांगरी घाट सध्या धोकादायक बनला आहे. सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे.

संगमेश्वर (देवरूख) व रत्नागिरी दोन तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गामध्ये देवरूख - रत्नागिरी हा मार्ग येतो. या मार्गावरून नियमित मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सध्या हा मार्ग चर्चेत आला आहे. या मार्गाची सोशल मीडियावर चांगल्या कामासाठी चर्चा होत आहे. कारण तीन-चार वर्षांपूर्वी हा रस्ता बनला गेला. बावनदी ते देवरूख या मार्गावर एकही खड्डा नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा एकही खड्डा पडला नाही. यामुळे हा रस्ता सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम परजिल्ह्यातील एका ठेकेदाराने केले आहे. काम उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचे झाल्याने हा रस्ता आजही सुस्थितीत आहे.

हा रस्ता चांगला असला तरी पांगरी घाटात दरड खाली येण्याचे प्रकार वाढत असल्याने धोकादायक बनला आहे. मंगळवारी दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. बुधवारी सुद्धा पुन्हा दरड कोसळली आहे. आहेत, यामुळे एकेरी वाहतूक सुरु आहे. या दरडी का पडत याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

घाटात दिवसाढवळ्या सुरुंग
सध्या पांगरी घाट धोकादायक बनला आहे. वारंवार दरर्डी रस्त्यावर येण्याचे प्रकार वाढले आहेत. या घाटात दगडांसाठी सुरुंग लावले जात आहेत. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या सुरुंग लावून स्फोट घडवला जात आहे. असे असताना संबंधित यंत्रणा मात्र डोळेझाक करत आहे. हे न उलगडणारे कोडे आहे. स्फोटामुळे पांगरी घाट हा वारंवार हादरे बसून खाली येत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. या बाबत चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow