उदय सामंत विसर्जन सभेचे सामंत समर्थकांकडून विसर्जन

Jul 28, 2024 - 21:14
 0
उदय सामंत विसर्जन सभेचे सामंत समर्थकांकडून विसर्जन

रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिक कमालीचे संतप्त झालेले पहावयास मिळत आहेत. मागील अनेकवर्षांपासून या समस्येतून नागरिकांना जावे लागत आहे. नागरिकांच्या याच प्रश्नाला धरून काहीनी आज ना. उदय सामंत याना लक्ष करण्याचा प्रयत्न केला. आम्ही रत्नागिरीकर या नावाने उदय सामंत विसर्जन सभा या मथळ्याखाली मेसेज काहीनी वितरित केले होते. या केलेल्या आवाहनानुसार आज रत्नागिरी मारुती मंदिर येथील हॉटेल विवा येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सामंत समर्थकांनी एक रत्नागिरीकर म्हणून या सभेला मोठ्या संखेने उपस्थिती लावत ही सभा उधळून लावली. मोठ्या संखेने शिवसैनिक या सभेला उपस्थित राहाणार असल्याचे कळताच ही सभा रद्द करण्याचा देखील प्रयत्न झाला तर काहीनी येथून काढता पाय घेतला. सामंत समर्थकांच्या या गराड्यात माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार जैन हे गावले. हे पाहताच या सभेच्या आयोजनातील काही जणांनी सोयीस्करपणे काढता पाय घेतला. तर उदय सामंत विसर्जन सभा या आशयाचा मेसेज फिरवणाऱ्या एका डॉक्टर ने या सभेला येणेच टाळले.

या सभेत शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी ना. सामंत यांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती दिली. माजी नगरसेवक राजन शेट्ये यांनी देखील यावेळी सामंतांच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर विजय कुमार जैन याना आपले मुद्दे मांडण्याची विनंती शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर यांनी केली. मात्र या वातावरणात मला बोलता येणार नाही, भले तुम्ही मला मारलेत तरी चालेल असे विजय कुमार जैन यांनी सांगितले. यावेळी मात्र सामंत समर्थक आक्रमक पद्धतीने आपले मुद्दे मांडताना दिसत होते. अखेर माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर आणि विजय कुमार जैन यांनी याठिकाणाहून काढता पाय घेतला. एकंदर उदय सामंत विसर्जन सभा या मथळ्याखाली आयोजित सभेचे सामंत समर्थकांनी विसर्जन केल्याचे पहावयास मिळाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow