रत्नागिरीत लोकअदालतीत ३४५९ प्रकरणे निकाली

Aug 1, 2024 - 10:59
 0
रत्नागिरीत लोकअदालतीत ३४५९ प्रकरणे निकाली

रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्य न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार २० जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातून ३४७५ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि ९०२६ वादपूर्ण प्रकरणे दाखल करण्यात आली होती. यापैकी ३४५९ प्रकरणांमध्ये निवाडा होऊन वाद संपुष्टात आले.

न्यायालयात वर्षानुवर्षे चार प्रलंबित राहिल्यामुळे त्याचा परिणाम कौटुंबीक सामाजिक स्वास्थ्यावर पडताना दिसून येतो. काही वेळा न्यायालयीन प्रक्रियेचा वापर विरुद्ध पक्षकाराला त्रास देण्यासाठीसुद्धा केला जातो. वादावर तोडगा निघत नसल्यामुळे वाद प्रलंबित राहून विलंबामुळे न्यायाच्या उद्देशाला तडा जातो. जास्त संख्येने प्रलंबित असलेले वाद यामुळे न्याय यंत्रणेवरसुद्धा ताण येतो आणि त्यामुळे निर्णय प्रक्रियाला विलंब होतो. प्रलंबित असलेला वाद हा दोन्ही पक्षकारांच्या हिताचा नसतो. केवळ आर्थिक किंवा वेळेचा अपव्यय तेवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित राहिला नसून मानसिक ताणतणावामुळे होणारी हानी ही पैशाच्या स्वरूपातसु‌द्धा भरून काढ़ता येणारी नसते. त्याच पार्श्वभूमीवर लोकन्यायालय म्हणजेच लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून वाद निवारण हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचा फायदा दि. २० जुलै रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये हमारी पक्षकारांनी घेतला.

लोकअदालतीचे उद्‌घाटन मा. रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा न्यायाधीश १ ए. एम. अंबाळकर, सचिव तथा वरिष्ठ न्यायाधीश रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण निखिल गोसावी व इतर सर्व न्यायिक अधिकारी आणि विधिज्ञ उपस्थित होते. लोकअदालतीमध्ये एकूण ९ कोटी २४ हजार ६२६ रुपये एवढया रकमेची वसुली आणि वाद सामंजस्याने निर्णित झाले. त्यामध्ये वकीलवर्ग व पक्षकार यांचा सहभाग होता.

ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुनील गोसावी, निखिल गोसावी गांच्या गार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समिती व त्यांचे कर्मचारी त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

परिस्थितीला अनुसरून निवाडा
लोकअदालत ही लवचिक प्रक्रिया असून, त्यावर पक्षकारांचे नियंत्रण असते. परिस्थितीला अनुसरून त्यामध्ये निवाडा घेता येती, अनेक पक्षकारांमधील दुरावा, नातेसंबंध स्नेहात बांधले गेले, वादाचा निर्णय जलद आणि मैत्रीपूर्ण वातावरणात झाला. त्यामुळे पक्षकारांची आर्थिक हानी झाली तर नाहीच, त्याचवरोबर त्यांना मानसिक आणि आत्मिक समाधान प्राप्त झाले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow