रत्नागिरीत 'उबाठा' शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताहाचे आयोजन

Aug 1, 2024 - 13:08
Aug 1, 2024 - 14:01
 0
रत्नागिरीत 'उबाठा' शिवसेनेच्या वतीने भगवा सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने रत्नागिरी तालुक्यात दि. ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय बुधवार ३१ जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट हा कालावधी भगवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार असल्यामुळे या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात शिवसेना नेते माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालयात तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली. शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ही उपजिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, विधानसभा क्षेत्रसंघटक सायली पवार, तालुकासंघटक साक्षी रावणंग, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, राकेश साळवी, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow