रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील झिलाजी कोकरे सेवानिवृत्त

Aug 3, 2024 - 11:13
 0
रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील झिलाजी कोकरे सेवानिवृत्त

रत्नागिरी : रत्नागिरी तहसीलदार कार्यालयातील महसूल विभागात नाईक पदी कार्यरत असलेले श्री. झिलाजी गोविंद कोकरे हे 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 जुलै रोजी निवृत झाले.
     
अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेले श्री. झिलाजी गोविंद कोकरे हे 1994 मध्ये शासन सेवेत रुजू झाले होते. शासनाची सेवा करताना आपण समाजाचे देण लागतो या भावनेतून जिल्हा धनगर समाजाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्याचा गौरव व सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन कुटुंबीय व समाजाच्या वतीने माध्यमिक पतपेढी रत्नागिरी येथे करण्यात आले होते.


या शुभेच्छा कार्यक्रमाला रत्नागिरीचे तहसीलदार श्री. म्हात्रे, वकील सौ. सावंत, धनगर समाजाचे पद्माकर कोकरे, बावाशेठ जागळी, आंबा व्यापारी सुनिल झोरे इतर समाजबांधव, नातेवाईक, महसूल कर्मचारी ई उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow