खेड : भडगावच्या ज्ञानदीप प्रशालेतील फुटबॉल संघाची उत्कृष्ट कामगिरी

Aug 3, 2024 - 13:55
 0
खेड : भडगावच्या ज्ञानदीप प्रशालेतील फुटबॉल संघाची उत्कृष्ट कामगिरी

खेड : तालुक्यातील भडगाव येथील कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर माध्यमिक विभाग व कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव उच्च माध्यमिक विभाग या प्रशालेतील विद्याथ्यांनी जेसी खेड व शिवाजीयन्स फुटबॉल क्लब खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये १७ वर्षे गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, याच स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून आयुष राठोड याची निवड करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता क्रीडा शिक्षक संतोष भोसले तसेच माजी विद्यार्थी प्रथमेश रेवाळे, ऋतुज बेंडखळे, यश चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 03/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow