दामले विद्यालयात दीपोत्सवातून ऑलिम्पिक खेळांबाबत जनजागृती

Aug 5, 2024 - 10:06
 0
दामले विद्यालयात दीपोत्सवातून ऑलिम्पिक खेळांबाबत जनजागृती

त्नागिरी : येथील पालिका शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयात दीप अमावास्येच्या पार्श्वभूमीवर आयोजित दीपोत्सवात ऑलिम्पिक खेळाबाबत जनजागृती रांगोळी साकारण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या हस्ते करण्यात आले .

शिवलकर म्हणाले की, आपणही या दिव्यांप्रमाणे आपल्या आयुष्यात असणारा अंधकार दूर करू या. त्यासोबतच इतरांच्या आयुष्यातही आनंदमयी प्रकाश आणण्यासाठी प्रयत्न करू या. यावेळी शिवलकर यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजक गोष्टीच्या माध्यमातून दिव्याचे महत्त्व सांगितले. यावेळी विचारपीठावर संपर्क फाउंडेशनचे सूर्यवंशी, मुख्याध्यापिका नीलम जाधव उपस्थित होत्या.

सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेबाबत विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने यावर्षी दीपोत्सवातील रांगोळीचा विषय ऑलिम्पिक बोधचिन्ह असा ठेवण्यात आला होता. सव्वाशे फुटाच्या या रांगोळीवर विद्यार्थ्यांनी आणलेल्या विविध आकारांच्या दिव्यांची सुंदर आरास करण्यात आली होती. यानिमित्त विद्यार्थ्यांना दिव्यांची ओळख व्हावी, त्यांच्यातील कलात्मकता समजावी या उद्देशाने ही मांडणी करण्यात आली होती.

यानिमित्त विद्यार्थ्यांना दिव्याचा दिवटी ते एलईडी हा प्रवास दाखविण्यात आला. रांगोळी साकारण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. शिक्षिका सौ. मंजिरी लिमये यांच्या सुमधुर आवाजातील दिव्याच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow