रत्नागिरी : संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रात श्रावणमासानिमित्त स्तोत्रपठण वर्ग

Aug 5, 2024 - 10:03
 0
रत्नागिरी : संस्कृत विश्वविद्यालय रत्नागिरी उपकेंद्रात श्रावणमासानिमित्त स्तोत्रपठण वर्ग

त्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पां. वा. काणे उपकेंद्राद्वारे श्रावणमासानिमित्त दोन विशेष स्तोत्रपठण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.

श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये, उपवास, विविध सण यांची मांदियाळी असते. त्यातही यंदाचा श्रावण महिना आगळावेगळा आहे. कारण बऱ्याच वर्षांनंतर श्रावण महिन्याची सुरुवात आणि शेवट सोमवारी होत आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात असणारे शिवपूजेचे महत्त्व अधिक वृद्धिंगत होणार आहे. याच निमित्ताने १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान शिवस्तोत्र पठण आणि विवेचन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गाच्या माध्यमातून शिवपंचाक्षरी स्तोत्र, मार्गबंधू स्तोत्र, शिवमानसपूजा, काशिविश्वनाथ स्तोत्र, शिवनामावल्याष्टकम् या स्तोत्रांचे विस्तृत विवेचन केले जाणार आहे. या वर्गासाठी इच्छुकांनी https://chat.whatsapp.com/IYgJs413jTXHQy1kWPcO5I या लिंकवरून व्हॉट्स अॅप ग्रुपला जॉइन व्हावे.

भगवद्गीता आणि वेदांत वर्ग हा दुसरा महत्त्वाचा वर्ग आहे. श्रावण महिन्यात योग्य विचारआचार आणि व्यवहार याचा अंगीकार करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. आता ही संधी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने रत्नागिरीकरांना उपलब्ध होणार आहे. हा वर्ग १८ ऑगस्ट ते २४ ऑगस्ट या काळेत घेण्यात येणार आहे. या वर्गाच्या माध्यमातून भगवद्गीतेतील बारावा अध्याय (भक्तियोग), पंधरावा अध्याय (पुरुषोत्तमयोग) व याला पूरक वेदांत विचार मांडले जाणार आहेत. या वर्गासाठी इच्छुकांनी https://chat.whatsapp.com/D7dzZ7NvJxnF2AmVbuAtwy या लिंकवरून व्हॉट्स अॅप ग्रुपला जॉइन व्हावे.

हे दोन्ही वर्ग पूर्णतः मोफत आहेत. दोन्ही वर्ग सायंकाळी ५ ते ६ या वेळेत घेण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी अविनाश चव्हाण (83908 54926) यांच्याशी संपर्क साधावा. हे दोन्ही वर्ग प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी अर्ज भरावा. ऐन श्रावणात आलेल्या या संधीचा रत्नागिरीकरांनी अवश्य लाभ घ्यावा, असें आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow