चिपळूणातील सरपंच संघटना करणार तीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड

Aug 31, 2024 - 14:09
Aug 31, 2024 - 14:12
 0
चिपळूणातील  सरपंच संघटना करणार तीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड

चिपळूण : तालुक्यातील वृक्ष लागवडीला गती मिळण्यासाठी चिपळूण तालुका सरपंच संघटनेने पुढाकार घेतला आहे. संघटनेच्या माध्यमातून गावोगावी वृक्ष लावगड करून त्याची जोपासना करण्याचा निर्धार करण्यात आला. या मोहिमेची सुरुवात तालुक्यातील रिक्टोली येथे करण्यात आली. तालुक्यातील १३० सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या माध्यमातून सुमारे तीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्याचे ध्येय सरपंच संघटनेने ठेवले आहे.

काही दिवसांपूर्वी चिपळूण पंचायत समितीत चिपळूण तालुका सरपंच संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत संघटनेच्या विविध मागण्यांवर चर्चा करताना काही निर्णय घेण्यात आले. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांच्या नावाने प्रत्येकी एक झाड लावण्यात यावे. तसेच ते रोप जगविण्याची जबाबदारी संबंधित सरपंच, सदस्यांनी घेण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष योगेश चंद्रकांत शिर्के यांनी केले होते. त्यानुसार तालुक्यात संघटनेच्या माध्यमातून वृक्ष लागवड मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत पहिली वृक्ष लागवड तालुक्यातील रिक्टोली येथे करण्यात आली रिक्टोलीचे सरपंच दयानंद शिंदे सदस्य, पोलिस पाटील व ग्रामस्थांच्य उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली.

गेल्या काही दिवसात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रोपांर्थ लागवड करण्यात आली आहे. य झाडांची निगा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी राखणार आहेत.

दरवर्षी तालुक्यात ग्रामपंचायतींच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाते. गतवर्षी नाम फाऊंडेशन, टीडब्ल्यूजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली होती. यावेळी सरपंच संघटनेने वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेत त्याचे जतन करण्याचा निर्धार केल आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 31/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow