रेल्वे प्रवासात महिलेच्या पर्सची चोरी

Aug 5, 2024 - 12:12
 0
रेल्वे प्रवासात महिलेच्या पर्सची चोरी

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या ओक्खा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या अहमदाबाद येथील महिलेची पर्स चोरट्याने पळविली. शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ३० जूनला दुपारी तीनच्या सुमारास निदर्शनास आली. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्का जिगुरकुमार शेखानी (३०, रा. मुल्लीनाथ प्रभू सोसायटी आदिनाथ नगर, ओढराव, अहमदाबाद) या रेल्वेच्या ओख्खा एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांची डेक्सवर ठेवलेली पर्स पळविली. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow