चिपळूण : एन्रॉन पुलावरील कमान धोकादायक
चिपळूण : चिपळुणात आलेल्या जुलै २०२१ च्या महापुरात धोकादायक व खचलेला एन्रॉन पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्या पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूने लावण्यात आलेल्या लोखंडी कमानी झुकल्या असून, अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
महापुरानंतर एन्रॉन पूल खचून धोकादायक झाला होता. तब्बल दीड वर्षांच्या कालावधीनंतर पूल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र, अद्याप हा पूल पूर्णपणे दुरुस्त होऊन सुरक्षित वाहतुकीसाठी सुरू झालेला नाही. काही प्रमाणातील दुरुस्तीनंतर केवळ हलकी वाहने या पुलावरून नेण्यास परवानगी आहे. अवजड वाहतूक होऊ नये यासाठी दोन्ही बाजूला कमानी उभारण्यात आल्या आहेत. मध्यंतरी एका वाहनाची धडक बसून कमान वाकली होती. आता पुन्हा एकदा अस्तित्वात असलेली कमान वाकली असून, हलकी वाहने जाताना चुकून कमान अचानकपणे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 05/Aug/2024
What's Your Reaction?