राजापुरातील तीन शिक्षकांना 'डाएट'चा पुरस्कार प्रदान

Aug 12, 2024 - 11:00
Aug 12, 2024 - 11:43
 0
राजापुरातील तीन शिक्षकांना 'डाएट'चा पुरस्कार प्रदान

राजापूर :  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) रत्नागिरी यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष शिक्षक पुरस्कारांमध्ये एकाचवर्षी तब्बल तीन पुरस्कार पटकावित राजापूर तालुक्याने या पुरस्कारांवर आपल्या सातत्यासह नावीन्यपूर्ण कामगिरीच्या यशाची मोहर उमटविली. नीतेश देवळेकर यांना विशेष शिक्षक गटातील आदर्श आरडीसी सदस्य पुरस्कार, समीर तांबे (द्वितीय) आणि महेश हळदवणेकर (तृतीय) यांना विषयतज्ज्ञ गटातील आदर्श बीआरसी सदस्य पुरस्काराने डाएटतर्फे गौरविण्यात आले. डाएट प्राचार्य सुशील शिवलकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी  येथे पुरस्कार वितरण झाले. या वेळी ज्येष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, नम्रता शेजाळ, अनुपमा तावशिकर, सीमा इंगळे, श्री. लड्डे, श्री. बर्वे आदी उपस्थित होते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात व्हावी, या उद्देशाने समावेशित शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसह पालकांशी संवाद साधत त्यांचे मनोबल उंचावताना स्वयंरोजगार निर्मिती करणाऱ्या विविध उपक्रमांच्या कार्यशाळाही विभाग वा तालुकास्तरावर घेतल्या जात आहेत.

 या उपक्रमांसह दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी श्री. तांबे, श्री. देवळेकर, श्री. हळदवणेकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हे उपक्रम राबवित असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यामध्ये नावीन्यता निर्माण करण्यामध्ये त्यांनी योगदान दिले आहे. गेल्या सुमारे दहा वर्षांहून अधिककाळ कार्यरत राहून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत डाएटतर्फे त्यांना विविध पुरस्कार देउन गौरविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 12/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow