दिव्यांग विद्यार्थ्यांचे अंगीकृत कलागुण ओळखा : उत्तम भोसले

Aug 6, 2024 - 10:07
Aug 6, 2024 - 16:08
 0
दिव्यांग विद्यार्थ्यांचे अंगीकृत कलागुण ओळखा : उत्तम भोसले

त्नागिरी : दिव्यांग विद्यार्थ्यांचे अंगीकृत कलागुण शिक्षकांनी ओळखले पाहिजे, असे आवाहन राजापूरचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले यांनी केले. जिल्हा परिषध समग्र शिक्षा अभियान आणि राजापूर समावेशित शिक्षण विभागातर्फे सागवे येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आंबा कलम बांधणी कार्यशाळा पार पडली.

तिचे उद्घाटन करताना भोसले बोलत होते. दिव्यांगांचा अशा व्यवसायपूर्व कौशल्य उपक्रमातून विकास घडवून आणणे गरजेचे आहे. त्यासाठी समावेशित राजापूरची संपूर्ण टीम चांगले कार्य करत आहे, असे नमूद करून त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना रोजगारक्षम कौशल्ये आत्मसात व्हावीत या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.विशेष शिक्षक नीतेश देवळेकर यांनी प्रास्ताविकात कोकणात आंबा कलम बांधणी प्रशिक्षण गरजेचे असल्याचे विशद केले. विशेष तज्ज्ञ ज्ञानेश्वर गुरव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांसंबंधी सविस्तर माहिती देताना त्यांच्यासाठी अशा कौशल्याधिष्ठित उपक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट केले. कार्यशाळेत प्रशिक्षक नवनाथ वासगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकार्याने समावेशित शिक्षण विभागातील विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षक यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृतीतून आंबा कलम बांधणी करून घेतली. मान्यवरांनी आंबा कलम बांधणीची कृती विचारल्यावर दिव्यांग विद्यार्थ्यांनी क्रमानुसार कृती सांगितली. त्यावर सर्वांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यशाळेत दिव्यांग मुलांच्या प्रात्यक्षिकातून सर्व शिक्षक, विशेष शिक्षक, विशेष तज्ज्ञ यांनी घेतलेली मेहनत दिसून आली. कार्यशाळेला केंद्रप्रमुख शब्बीर शेख, सुनील जाधव, संस्थेचे पदाधिकारी विलास कुलकर्णी, आशीष कुलकर्णी, चंद्रकांत देवरूखकर, महेश सकपाळ, प्रकाश गुरव, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत कांबळे, सहाय्यक शिक्षक बलवंत मोहिते, विशेष शिक्षक मुकेश मधाळे, श्रीमतीरुबिना नावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलवंत मोहिते यांनी केले, तर भारत कांबळे यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow