देव-घैसास-कीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन

Aug 7, 2024 - 10:11
Aug 7, 2024 - 11:14
 0
देव-घैसास-कीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन

त्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव- घैसास - कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता विकास या विषयावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून सौरभ देवळे (डिलाईट इंडस्ट्री, रत्नागिरी), नितीन करंजवकर (काळीमिरी उत्पादक, नाटे), वैभव माने (लेखापाल, खादी ग्रामोद्योग महामंडळ, रत्नागिरी) धीरज मोरे (रिटेल सेंटर, नाचणे रोड, रत्नागिरी) उपस्थित होते. त्यांनी यशस्वी उद्योजक कसे व्हायचे, कोणत्या योजना आहेत, बँका काय सुविधा पुरवतात यासंदर्भात मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 07-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow